पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी (ता. निपाणी) जवळ अनोळखी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत म्हाकवे (ता. कागल) येथील तरुण सौरभ साताप्पा चौगुले (वय २५) गंभीर जखमी झाला.उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १२) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
सौरभ चौगुले हा आपल्या दुचाकीवरून निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यावर आयोजित कृषी मेळाव्याला गेला होता. मेळाव्यवरून तो रात्री उशिरा आपल्या मुळगावी म्हाकवे येथे परतत होता. मात्र यमगर्णी परिसरात एका वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत सौरभ गंभीर जखमी झाला. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. सौरभ हा एकुलता एक मुलगा होता. तो सौंदलगा व कुर्ली फाटा परिसरातील एका कापड दुकानात काम करत होता.
त्याच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा व आजी असा परिवार आहे.कुटुंबाचा आधार हरपलासौरभ कष्टाळू व मनमिळावू होता. त्याला चार वर्षांचा मुलगा असून पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.












