घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

पुण्यात मांजरावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाल्याचा प्रकार घडला आहे. शेजाऱ्यांच्या मांजराने लव्ह बर्डसचा पिंजरा पाडल्यानं वाद झाला. या वादातून आपल्यावर मांजराच्या मालकाने कोयत्यानं वार केल्याचा आरोप दुसऱ्या शेजाऱ्यानं केलाय.

या प्रकरणी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर मांजर मालकावर गुन्हा दाखल झालाय. दरम्यान, मांजर मालकाने सर्व आरोप फेटाळून लावत खोटी तक्रार दिली असल्याचं म्हटलंय.याबाबत मिळालेली माहिती अशी की, लव्ह बर्ड्सच्या पिंजऱ्याला शेजाऱ्यांच्या मांजरांनी पाडल्याचा आरोप करण्यात आलाय. मांजर मालकाला त्यांचं मांजर पिंजऱ्यावर येऊन बसतं त्याला समजावून ठेवा असं सांगितलं होतं.

तर मांजर मालकाने मांजर येणार नाही असं सांगत शिवीगाळ केली. यानंतर कोयत्यानं मारल्याचा आरोप लव्ह बर्ड्सच्या मालकानं केलाय.लव्ह बर्ड्स पक्ष्यांचं हृदय लहान असतं. जरासं काही झालं तरी धास्ती घेतात आणि ते घाबरतात. त्यामुळे मांजर मालकाला आम्ही सांगितलं होतं.

पण त्यातून वाद झाल्यानंतर आम्हाला मारहाण झाली. पोलिसातही तक्रार द्यायला गेलो पण तक्रार नोंदवली नव्हती. शेवटी सीपी साहेबांकडे गेल्यानंतर तक्रार नोंदवून घेण्यात आल्याचंही सांगितलं.

मांजर मालकाने या सगळ्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलंय. दोघांकडेही मांजर असून आमचं आणि त्यांच मांजर सेमच दिसतं असंही सांगितलं. आमचं लहान मांजर त्यांच्या साईडला जातं पण दारात जात नाही. तरीही त्यांनी आरोप केला की आमच्या मांजराने त्यांच्या पोपटाला मारलं.

मांजराने पक्ष्यांचा पिजरा खाली पाडल्याचा आरोप त्यांनी आमच्यावर केलाय. त्यावरून वाद झाल्यानंतर माझ्याविरोधात पोलिसात खोटी तक्रार दाखल केलीय. पण खरंतर कोयता मारल्याचं निव्वळ खोटं सांगितलंय. असं काही घडलंच नाही असंही मांजर मालकाने म्हटलं.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें