घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास घडली गोळीबाराची घटना अन् १२ तासाच्या आत

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव पोलिस स्टेशनच्या परिसरात जमिनीच्या वादातून गोळीबाराची घटना घडली होती. पोलिसांनी १२ तासांच्या आतमध्ये एका आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन परिसरात शनिवारी पहाटे गोळीबाराची थरारक घटना घडली होती. केडगाव स्टेशन परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेच्या शेजारी हा गोळीबार झाला. जमिनीच्या व्यवहारातून दोन गटामध्ये वाद झाला होता. या वादातून एका जणाने हवेत गोळीबार केला होता. गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या एकाने जमिनीच्या कारणावरून गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पहाटेच्या शांततेत गोळीबाराचा आवाज आल्याने स्थानिक नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता पिस्तुलीतून गोळीबार केलेल्या गोळीची पुंगळी सापडली.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि इतर माहिती गोळा केली. या प्रकरणी अखेरीस १२ तासांमध्ये एका गुन्हेगार युवकाला अटक केली आहे. जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये वाद झाला होता. या वादातून गोळीबाराची घटना घडली होती. यवत पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें