घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात नोकरीची मोठी संधी!

पुण्यात जिल्हा कौशल्य विकास केंद्र आणि एशियन कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यात २४ हून अधिक नामांकित कंपन्या १९००+ पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती करणार आहेत.

मेळाव्याची तारीख: १७ मार्च २०२६

वेळ: सकाळी १०:०० वाजता

ठिकाण: एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, पारी कंपनी चौक, नऱ्हे-धायरी रोड, पुणे.

सहभागी कंपन्या: जिल्ह्यातील नामांकित २४ हून अधिक कंपन्यांचा सहभाग.

या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध असून शैक्षणिक पात्रतेनुसार खालील उमेदवार अर्ज करू शकतात.१० वी आणि १२ वी उत्तीर्णडिप्लोमा धारककोणत्याही शाखेचे पदवीधर

ऑनलाईन नोंदणी:

इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.rojgar.mahaswayam.gov.in वर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी.

थेट मुलाखत: या मेळाव्यात खासगी कंपन्यांकडून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जातील.

कागदपत्रे: मुलाखतीसाठी येताना शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती (Zerox), आधार कार्ड आणि स्वतःचा अद्ययावत बायोडाटा (Resume) सोबत ठेवावा.

काही शंका असल्यास उमेदवार जिल्हा कौशल्य विकास कार्यालय (रास्ता पेठ, पुणे) येथे प्रत्यक्ष भेट देऊ शकतात किंवा ०२०-२६१३३६०६ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें