घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे महापालिकेची टीडीआर प्रक्रिया झाली सोपी

विविध आरक्षणाच्या जागा ताब्यात घेताना आरक्षणापोटी जागा मालकांना देण्यात येणाऱ्या ‘टीडीआर’च्या (हस्तांतरण विकास हक्क) कार्यपद्धतीत आयुक्तांनी बदल केले आहेत. त्यामुळे जागा मालकांना ‘टीडीआर’चा मोबदला मिळण्यास लागणारा विलंब कमी होणार आहे.

महापालिकेकडून हद्दीचा विकास आराखडा तयार केला जातो. त्यामध्ये विविध पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आरक्षणे दर्शविली जातात. ही आरक्षणे महापालिकेकडून रोख अथवा टीडीआरच्या स्वरूपात मोबदला देऊन ताब्यात घेतली जातात. ती विकसित करून नागरिकांना सुविधा पुरविल्या जातात.त्यानुसार टीडीआर स्वरूपात मोबदला देण्यासाठीची कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे.

मात्र, या कार्यपद्धतीमध्ये मोबदला देण्यास मोठा विलंब लागतो. त्यातून गैरप्रकारही होतात. या पार्श्वभूमीवर टीडीआर स्वरूपात मोबदला देण्यासाठीचा कालावधी कमी करण्यासाठी आयुक्त नवलकिशोर राम यांनी परिपत्रक काढून बदल केले आहेत.त्यानुसार टीडीआरचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर सर्व खात्यांची मान्यता मिळाल्यानंतर तो पुन्हा ‘डीआरसी’ (हस्तांतरण विकास हक्क प्रमाणपत्र) देण्यासाठी पहिल्यापासून पुन्हा सर्व प्रक्रिया करावी लागते.

त्यामध्ये ‘डीआरसी’ देण्यासाठी नगर अभियंता यांच्या स्तरावर मान्यता मिळाल्यानंतर थेट प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी जाणार आहे.या दरम्यानचा अतिरिक्त आयुक्तांकडे टप्पा आता वगळण्यात आला आहे. त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार असल्याने बांधकाम क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें