घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सिंहगडवरील रामकड्याची भवानी माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

पुणे प्रतिनिधी : शांताराम लांघे

पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ले परिसरातील रामकड्याची भवानी माता मंदिर परिसरात गड किल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता दुरूकदरा गावातून मंदिराकडे प्रस्थान करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. उंच व सरळ कातळ कड्यात कोरलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतरच मंदिर परिसर समोर येतो, अशी या ठिकाणाची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. मंदिर परिसरात खडकात कोरलेल्या विविध देव-देवतांचे तांदळा स्वरूपातील स्थान देखील आढळते.

मोहिमेदरम्यान मंदिर परिसरातील काटेरी झुडपे आणि गवत काढून स्वच्छता करण्यात आली. तसेच संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेला श्री भवानी माता आणि राखणदार शिपाई बुवा यांच्या इतिहासाची माहिती देणारा फलक मंदिर परिसरात बसविण्यात आला.

यानंतर सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ आमले यांच्या हस्ते भवानी मातेची पूजा करून आरती करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेचे आयोजन सिंहगड विभागाध्यक्ष शांताराम लांघे आणि उत्सव प्रमुख दत्ता बंडू जोरकर यांनी केले.

या मोहिमेत पुणे विभागाध्यक्ष विजय साळेकर, उत्सव प्रमुख जीवन बराटे, श्रीनाथ घाडी, सौरभ शिंदे, माणिकाताई पवार उपस्थित होते. तसेच भवानी मातेचे पुजारी शिवाजी लांघे यांचे आणि स्थानिक ग्रामस्थ विशाल लांघे व संदीप लांघे यांचेही सहकार्य लाभले.

या संपूर्ण उपक्रमाबाबतची माहिती संस्थेचे संस्थापक साईनाथ जोशी यांनी दिली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें