घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

यशाचे ‘शिखर’ सर करणाऱ्या गुणवंतांचा पुण्यात गौरव

युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या वतीने कै. डॉ. बी. एन. देशपांडे आणि डॉ. विनोद डोंबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या बीएएमएस 2025 परीक्षेत यश संपादन केलेल्या तसेच संस्थेच्या मोफत यूपीएससी व एमपीएससी मार्गदर्शन आणि शिष्यवृत्ती उपक्रमातून यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम हडपसर येथील टेरेट्री रेस्टॉरंट येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बीएएमएस अंतिम परीक्षेत विद्यापीठात प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. तनया काळे, डॉ. ऋतुजा भाकरे आणि डॉ. ऋषिकेश पराड यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच विविध विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या डॉ. ऋतुजा भाकरे (कायचिकित्सा) आणि डॉ. गजानन कुलकर्णी (शल्यतंत्र) यांचाही सन्मान करण्यात आला.

संस्थेच्या मार्गदर्शनाखाली यूपीएससी परीक्षा 2024-25 मध्ये यश मिळवलेल्या मनोज पाटील, धनंजय दिघे, अल्पेक्ष ढवळे आणि हेमकृष्ण पिसदे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या मंगेश सुरुशे आणि चेतन वंजारी यांचाही गौरव करण्यात आला. CAPF परीक्षेत यश संपादन केलेल्या अनुप द्विवेदी, भुवनेश कांबळे आणि निखिल वसईकर यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला पोलीस उपमहानिरीक्षक प्रकाश रेड्डी, सीबीआय उपमहानिरीक्षक सारा शर्मा, पुणे पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुख डॉ. विनोद गायकवाड, डॉ. महेश दळे, राज्याचे उपमहासंचालक (नारकोटिक्स) डॉ. केतन पाटील, पोलीस अधीक्षक जयश्री देसाई आणि सोहम मांढरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना जिद्द, सातत्य आणि कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रम गायकवाड यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा देताना आतापर्यंत यूपीएससी, CAPF आणि एमपीएससी परीक्षांमध्ये एकूण 53 विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. समीर ननावरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सोनल भालेराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. कल्पेश वाणी यांनी केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें