घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात सैराट स्टाईलने तरुणाची निर्घृण हत्या

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडला आहे. प्रेमप्रकरणातून एका तरुणाची सैराट स्टाईलने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कोथरूड सारख्या गजबजलेल्या परिसरात भररस्त्यात झालेल्या या थरारामुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे.

प्रेयसीला भेटायला गेलेल्या या तरुणाचा असा काही करुण अंत होईल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या असून, या हत्याकांडात तब्बल 10 जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यात प्रेमप्रकरणातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोथरूड परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जाधव (रा. गोखले नगर, वडारवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. नागेशचा एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, संबंधित मुलीने मोबाईलवरून फोन करून नागेशला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी त्याला टेरेसवर नेऊन बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारहाणीच्या वेळी नागेशच्या अंगावर कपडेही नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. आरोपींनी लाकडी दांडक्याने तसेच लाथा-बुक्क्यांनी नागेशला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागेशच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांकडून झालेल्या मारहाणीत नागेशचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड पोलिस करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें