घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने उचलले ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल

घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणातील गोंधळ आणि एजन्सीसमोरील गर्दीवर लगाम घालण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. आता गॅस सिलेंडरचे वितरण केवळ OTP प्रणालीद्वारेच करण्यात येणार आहे.तसेच गॅस बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या व गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा फक्त OTP प्रणालीद्वारेच करावा, असे आदेश देण्यात आले. तसेच गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट सिलेंडरचे वितरण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

ग्राहकांनी गॅस बुकिंग केल्यानंतर ९६ तासांच्या आत सिलेंडर घरपोहोच देणे सर्व वितरकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.यासोबतच सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या कार्यालय किंवा गोदामाबाहेर ‘गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच ९६ तासांच्या आत घरपोच करण्यात येईल’ असा स्पष्ट फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्राहकांनी एजन्सीसमोर गर्दी करू नये, यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMSद्वारे माहिती देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

भारतासह अनेक देशांना बसतोय फटका

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा 18 वा दिवस असून, भारतासह जगभरातील अनेक देशांना या युद्धाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. या युद्धामुळे अनेक देशांमध्ये एलपीजी, एसपीजी गॅस आणि पीएनजी गॅस पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात तर एलपीजी गॅस सिलिंडरचाही तुटवडा निर्माण झाला आहे. संपूर्ण देशात तणाव वाढत चालली आहे.

सिलेंडरसाठी भरउन्हात ग्राहकांच्या रांगाच रांगा

दुसरीकडे, खेड्यापांसून मोठमोठ्या शहरांमध्येही सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लागल्यामुळे एक तणावाची परिस्थिती आहे. अशातच केंद्र सरकारने आता गॅस सिलिंडरबाबत नवीन नियमावली जारी केली आहे. यामुळे ज्यांच्याकडे गॅसचे दुहेरी कनेक्शन आहे. त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीचा पुरवठा स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें