व्यावसायिकाला धमकावून ६० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील पेरणे फाटा परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत सचिन मोहनराव धर्माधिकारी (वय ३६, रा. डोंगरगाव, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्माधिकारी यांचे पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील पेरणे गाव परिसरात दुकान आहे. ८ मार्च रोजी ते रात्री पावणेनऊच्या सुमारास दुकान बंद करुन घरी निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना पेरणे गाव परिसरात अडवले. त्यांना धमकावून चोरट्यांनी ६० हजारांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेली. सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.












