घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शाळेतून घरी आला,कपडे बदलून खेळायला गेला, नंतर शेतात… कुटुंबियांनी हंबरडा फोडला

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत सहावीत शिकणाऱ्या एका मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.खरं तर हा मुलगा शाळेतू घरी आला त्यानंतर कपडे बदलून खेळायला गेला होता.त्यानंतर अचानक त्याचा मृतदेह शेतात सापडला होता.

साई मांजरे असे या मृत मुलाचे नाव आहे.शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्तीत ही घटना घडली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नसून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने ग्रामस्थ प्रचंड आक्रामक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नसून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत साई मांजरे हा तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता. आज दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलून तो खेळण्यासाठी शेताकडे गेला होता. त्यानंतर त्याच भागात त्याचा मृतदेह आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

यावेळी मुलाच्या डोक्याला मार लागला आहे आणि त्याच्या अंगावर पॅन्ट नाही आहे. त्यामुळे ही हत्या आहे की हा घातपात झाला आहे? याचा उलगडा होत नाही आहे.या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रामक झाले असून मुलाचा मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यास ग्रामस्थांनी विरोध केला असून जोपर्यंत घटनेचा पूर्ण उलगडा लागत नाही व तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नसल्याची ग्रामस्थांनी भूमिका घेतली आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तर वनविभागाची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें