घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

स्नूकर खेळताना खुन्नस दिली, रागाच्या भरात तरुणांनी मित्रालाच संपवलं

वाघोलीमध्ये कॉलेजबाहेर तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना ताजी असताना पुणे शहरामध्ये तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. भररस्त्यात धारदार शस्त्रांनी वार करत तरुणाला संपवण्यात आले. या हत्येमागचं कारण समोर आले आहे.

स्नूकर खेळताना खुन्नस दिल्याच्या रागातून हे हत्याकांड घडलं. तरुणांनी आपल्या मित्रालाच जागीच संपवलं. या हत्याकांडाने पुणे हादरले.पुण्यातील सिंहगड रोडवर सोमवारी संध्याकाळी ३ जणांनी धारदार शास्त्राने एका तरुणावर वार करत त्याची हत्या केली.

भर चौकात संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे सिंहगड रोड परिसरात एकच खळबळ उडाली होती. करण काशीद असे हत्या झालेल्या १९ वर्षीय तरुणाचे नाव होते. मित्राची हत्या करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता पण पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.घटना घडल्यानंतर काही तासातच सिंहगड रोड पोलिसांनी या प्रकरणी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. करण आणि तिन्ही आरोपी एकमेकांना ओळखत असून मित्र होते.

जानेवारी महिन्यात स्नूकर खेळत असताना करण काशीदने या तिघांकडे रागाने बघितलं होतं. या गोष्टीचा राग मनात ठेवत या तीन अल्पवयीन तरुणांनी करणचा काटा काढायचं ठरवलं. याच रागातून त्यांनी करणची हत्या केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना चौकशीदरम्यान दिली. तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें