घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

रिपब्लिकन पक्षाच्या हंगामी शहराध्यक्षपदी शैलेंद्र चव्हाण

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहरचे हंगामी शहराध्यक्ष म्हणून शैलेंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली. रिपाइंच्या शहर समितीच्या रविवारी आयोजित सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

या वेळी पुणे शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण यांची हंगामी शहराध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी रोहिदास गायकवाड, आसित गांगुर्डे, अशोक शिरोळे, अशोक कांबळे, हिमाली कांबळे, नीलेश आल्हाट, बाबूराव घाडगे, महेंद्र कांबळे, रफिक दफेदार, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, महादेव दंडी, महादेव कांबळे, सुगत धसाडे आदी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें