घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

न्यूझीलंडमध्ये पुण्याच्या खेळाडूंची ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन’मध्ये बाजी

न्यूझीलंडमधील टाउपो शहरात आयोजित ‘आयर्नमॅन ७०.३ ट्रायथलॉन’ ही स्पर्धा पुण्यातील सत्यजित जोशी आणि मंदीपा भाटिया यांनी यशस्वीपणे पूर्ण करत दमदार कामगिरी केली. जोशी यांनी ही स्पर्धा सहा तास आठ मिनिटांत, तर भाटिया यांनी आठ तास दोन मिनिटांत पूर्ण केली.

या स्पर्धेत जगभरातील सुमारे दीड हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तर, स्पर्धेत १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी हाफ मॅरेथॉन धावणे, असे तीन टप्पे खेळाडूंनी ८ तास ३० मिनिटांच्या निश्चित वेळेत पूर्ण करणे आवश्यक होते. ‘लेक टाउपो’ येथून स्पर्धेला सुरुवात झाली.

थंड पाणी, वेगवान वारे आणि उसळणाऱ्या लाटांमुळे पोहण्याचा टप्पा आव्हानात्मक ठरला. तर सायकलींदरम्यान चढ-उतार असलेले मार्ग आणि वेगवान वाऱ्यामुळे खेळाडूंच्या सहनशक्तीची कसोटी लागली असल्याचे दोन्ही खेळाडूंनी सांगितले.

”ही माझी तिसरी आयर्नमॅन स्पर्धा होती. प्रत्येकवेळी नवे आव्हान असते; मात्र सातत्यपूर्ण सराव आणि मानसिक तयारीमुळे हे लक्ष्य गाठता आले,” असे जोशी यांनी सांगितले.

तर, भाटिया यांनी ही स्पर्धा ‘बॉयंट अक्वॅटिक्स’चे प्रशिक्षक प्रतीक जवडेकर आणि ‘एबीसीडी मल्टी-स्पोर्ट्स’चे प्रशिक्षक ओंकार जोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. स्पर्धा पूर्ण करणे हा माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक अनुभव ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें