घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी

गारांसह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे पुणे- सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री (ता. भोर) येथे महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. तासाभरात पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

महामार्गावर हरिश्चंद्री फाट्यावर उड्डाणपुलाचे काम चालू आहे. त्यामुळे सातारा बाजूकडून येणारी वाहतूक पुण्याकडे जाण्यासाठी सेवा रस्त्यावरून वळवली आहे. दोन्ही बाजूकडून उतार असलेल्या या रस्त्यावर आज दुपारी चारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पावसाने पाणी तुंबले.तेथील पाणी वाहून जाण्यासाठी बंद गटाराची योजना केली आहे.

परंतु त्यामध्ये पाणी जाण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे पाणी तुंबून राहिले. शेवटी वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या कामावरील यंत्रसामग्री घेऊन, उंच असलेले चेंबर फोडले. त्यामुळे पाण्याचा निचरा झाला. वाहतूक सुरळीत होण्यासाठी रात्रीचे आठ वाजले होते.या दरम्यान, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

हरिश्चंद्रीचे नागरीक विकास गाडे यांनी सांगितले, की अभियंत्यांनी व ठेकेदारांनी पाण्याचा निचरा होण्याबाबत अगोदरच नियोजन करणे गरजेचे होते. कामाचे ठेकेदार निखिल कंस्ट्रक्शन ग्रुपचे सुनील सुरवसे म्हणाले, की अचानक आलेल्या पावसाने माती वाहून आली. त्यामुळे पाणी वाहणारे पाईप तुंबल्याने पाणी साचून राहिले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें