घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात

धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. माजी आरोग्य मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारचा पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला.

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, काल (मंगळवारी) मुंबई येथे धनंजय सावंत यांच्या पत्नी, मुलांसह त्यांच्या समर्थकांनी शिवसेना सोडून भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला होता. हा पक्षप्रवेश सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रम आटोपून धाराशिवकडे परतत असताना मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास भिगवणजवळ सोलापूर-पुणे महामार्गावर त्यांच्या फॉर्च्युनर कारला एका भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारचे मोठे नुकसान झाले असून गाडी चक्काचूर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जीवित हानी टळली

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, धनंजय सावंत यांचे पुत्र, चालक आणि सुरक्षारक्षक यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. धनंजय सावंत आणि इतर जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून ते सध्या सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें