घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे विभागात गहू काढणीला वेग

रब्बी हंगामातील गव्हाच्या काढणीला पुणे विभागात गेल्या पंधरा दिवसांपासून वेग आला असून, अनेक तालुक्यांत शेतकरी काढणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र मजूरटंचाईची समस्या तीव्र होत असल्याने वाढीव मजुरी देऊन काढणी करावी लागत आहे.परिणामी, शेतकऱ्यांचा ओढा आता ‘हार्वेस्टर’ यंत्रांकडे वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

यंदा गव्हाच्या पेरणीस सुरुवातीला अनुकूल हवामान उशिरा तयार झाले. तरीही पाण्याची उपलब्धता आणि थंडीची साथ मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी गहू पिकाला प्राधान्य दिले. विभागातील सरासरी २.१९ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा सुमारे २.७५ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, हे प्रमाण १२६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

सध्या पीक पक्व अवस्थेत आले असून, काढणी अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी काढलेला गहू मशीनच्या साहाय्याने मळणी आणि प्रतवारीसाठी प्रक्रियेत आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पारंपरिक पद्धतीत गहू काढणीसाठी सोंगणी, पेंढ्या बांधणे आणि मळणी यासाठी मजुरांना एकरी दोन पोती गहू द्यावे लागतात. त्याशिवाय मळणी यंत्राचा खर्च वेगळा असतो. याउलट, हार्वेस्टरद्वारे अवघ्या अर्ध्या तासात काढणी पूर्ण होत असल्याने वेळ आणि पैशांची बचत होत आहे.

गव्हाच्या भुसाचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी होत असल्याने काही शेतकरी भुसासाठी स्वतंत्र व्यवहार करतात. सरासरी एकरी १५ ते १८ पोती उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.दरम्यान, उजनी धरण क्षेत्रासह विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने यंदा गव्हाचे क्षेत्र वाढले. मात्र काढणीदरम्यान मजूरटंचाई आणि वाढलेला खर्च ही मोठी आव्हाने ठरत आहेत.

यंत्रामुळे वेळ आणि मेहनतीची बचत

पारंपरिक पद्धतीने एक एकर गहू काढण्यासाठी १० ते १२ मजूर लागतात. त्यासाठी ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. तर हार्वेस्टरमुळे अवघ्या अर्ध्या तासात काढणी पूर्ण होत असून खर्चही तुलनेने कमी येतो.

खर्चाचा वाढता बोजा

हार्वेस्टर दर एकरी २,००० ते ३,००० रुपये

भुस्सा हवे असल्यास एकरी ६,००० रुपयांपर्यंत

महिला मजूर मजुरी २५० ते ३०० रु. प्रतिदिन

पुरुष मजूर मजुरी ४०० रु. प्रतिदिन

पारंपरिक काढणी खर्च एकरी ४,००० ते ५,००० (मळणी वेगळी)

विलास शिंदे, शेतकरी, मलठण (शिरूर)पूर्वी गहू काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर आणि मेहनत लागत होती. त्यामुळे अनेक शेतकरी गहू पिकाकडे दुर्लक्ष करत. आता यांत्रिकीकरणामुळे कमी वेळेत आणि कमी मेहनतीत काढणी होत असल्याने हार्वेस्टरला सर्वांची पसंती मिळत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें