घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

लघुशंकेसाठी थांबलेल्या युवकाची ठेचून हत्या.

पुणे शहरात कबुतर चोरीच्या संशयावरून एका युवकाला लाथाबुक्क्यांनी आणि बॅटने अमानुष मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वानवडीतील वैदूवाडी परिसरात घडली आहे. रूपेश शिंदे (वय १९, रा.मोशी) असे या मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.रूपेश आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हे बुधवारी पहाटेच्या सुमारास मोशीकडे जात होते. यावेळी ते हडपसर जवळील एका मोकळ्या जागेत लघुशंकेसाठी थांबले होते. तेथून जवळच असलेल्या कबुतरांच्या बॉक्सजवळ गेल्यावर कुत्रे भुंकू लागल्याने हे दोघे घाबरून पळू लागले. मात्र, हे दोघे कबुतर चोर असल्याचा संशय आल्याने स्थानिक पाच जणांनी त्यांचा पाठलाग केला.

पळताना रूपेश मुख्य रस्त्यावर खाली पडला. यावेळी पाठलाग करणाऱ्या संशयितांनी त्याला गाठले आणि लाथाबुक्क्यांसह क्रिकेटच्या बॅटने सपासप वार केले. या भीषण मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रूपेशचा मृत्यू झाला. मृत युवकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवली. याप्रकरणी पोलिसांनी गौरव माजी (वय २२), सचिन माजी (वय २३), मोनु माजी (वय २६) आणि बंटी माजी (वय १८) या चार सख्ख्या भावांना सायंकाळपर्यंत अटक केली आहे. किरकोळ संशयावरून एका युवकाचा जीव गेल्याने वैदूवाडी परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें