घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर पुणे येथे हृदयशस्त्रक्रिया!

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज दुपारी छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची अँजिओग्राफी केली. त्यानंतर ॲन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समिन शर्मा यांनी यशस्वीरित्या पार पाडली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या प्रमोद सावंत यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

आजच त्‍यांच्या मुख्यमंत्रीपदाची 7 वर्षे पूर्णविषेश म्हणजे डॉ. प्रमोद सावंत यांना गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून 19 मार्च रोजी 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली होती.

गुरुवारी, १९ मार्च रोजी ७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. १९ मार्च २०१९ रोजी त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतरही तेच राज्याचे मुख्यमंत्री बनले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें