घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

उपचाराचे पैसे मागितल्याने मद्यपी तरुणाकडून डॉक्टरला मारहाण

उपचाराचे पैसे मागितल्याच्या रागातून मद्यपी तरुणाने डॉक्टरांना धक्काबुक्की करत रुग्णालयात तोडफोड केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली.या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी (वय ३७, रा.लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष रमेश गुंजाळ (वय ३५, रा. काकडे वस्ती, थेऊर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टरांचे पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा येथे रुग्णालय आहे. बुधवारी (ता. १८) दुपारी पावणेएकच्या सुमारास आरोपी गुंजाळ हा डोक्याला दुखापत झाल्याने रुग्णालयात आला होता.

डॉक्टरांनी त्याच्यावर मलमपट्टी करून उपचार केले. उपचाराचे पैसे मागितल्यावर गुंजाळने पैसे देण्यास नकार देत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर त्याने गोंधळ घालत दगडाने रुग्णालयाच्या काचेचा दरवाजा फोडला. फुटलेल्या काचेचा तुकडा एका रुग्णाच्या हाताला लागून तो जखमी झाला. तसेच, आरोपीने डॉक्टरांवर दगड फेकून मारल्याने तेही जखमी झाले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें