घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यावर ‘रॅगिंग’?

कृषी महाविद्यालयात ‘स्पिरिट आऊट’च्या नावाखाली प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला सहा महिन्यांपासून सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांपासून दूर ठेवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या माध्यमातून ‘रॅगिंग’ होत असल्याची गंभीर तक्रार संबंधित विद्यार्थ्याने केली आहे. दरम्यान, महाविद्यालयात असा ‘रॅगिंग’चा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा प्राचार्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असल्याचेही त्यांनी सांगितले.’महाविद्यालयातील काही सीनियर्स विद्यार्थ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते.

‘खाली मान घालून बोला, ‘सर’ म्हणा’, असा दबाव टाकला जातो. महाविद्यालयात त्याला एकटे पाडले जात असून, काही विद्यार्थ्यांनी त्याचा पाठलागही केला. एका कार्यक्रमात विनाकारण वाद घालण्याचा प्रयत्न झाला. या भीतीपोटी वसतिगृह सोडून नातेवाइकाकडे राहावे लागत आहे,’ असा आरोप संबंधित विद्यार्थ्याने केला आहे.

याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार देऊनही ठोस कारवाई झालेली नाही. या संदर्भात राज्यपाल आणि कुलगुरू यांच्याकडेही तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या विद्यार्थ्याने केली आहे.

या संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महानंद माने म्हणाले, ‘महाविद्यालयात अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. संबंधित विद्यार्थ्याचे इतर मुलांशी पटत नाही. हा ‘रॅगिंग’चा प्रकार असू शकत नाही. त्याच्याशिवाय इतर विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण नाही.

केवळ महाविद्यालयातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तथापि या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रशासनाने समिती नेमली आहे. संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी करणार असून, त्यात काही निष्पन्न झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.’

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें