घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

दगडूशेठ’ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची आरास

पुणे : श्री गणेश नामाचा जयघोष…फुलांची आकर्षक आरास…रांगोळीच्या पायघड्या…बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४२ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली.परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते गणरायाची आरती करून गुढीपूजन करीत गुढी उभारण्यात आली.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मंगेश सूर्यवंशी, विलास रासकर, गजानन धावडे, बंडू गावडे, अथर्व केदारी यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गणेशयाग, अभिषेकांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, गुढीपाडव्यापासून म्हणजेच दि. १९ ते २३ मार्च पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा संगीत महोत्सव दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.

संगीत महोत्सवात दिग्गज कलाकारांसह युवा कलाकारांचे सादरीकरण अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. रसिकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि. मराठी शाळा येथे करण्यात आली आहे. संगीत महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें