घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

फक्त राजीनामा नको, रुपाली चाकणकरांवर मकोका लावा

रुपाली चाकणकर यांचा फक्त राजीनामा नको आहे, त्यांच्यावर मकोका नुसार कारवाई करुन महिला लैंगिक शोषण प्रकरणात सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. रुपाली चाकणकर यांनी आतातरी झोपेतून जागे व्हावे, शुद्धीत यावे.

त्यांनी सत्तेचा सगळा अहंकार सोडला पाहिजे. आता तुम्ही जमिनीवर आला आहात, भविष्यात अजून जमिनीवर येणार आहात, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नुकताच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला.

रुपाली चाकणकरांना मकोका लावला पाहिजे

शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. त्यांना महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात सहआरोपी केली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. रुपाली चाकणकर या अशोक खरातकडून चालवल्या जाणाऱ्या संघटित गुन्हेगारीचा सक्रीय भाग होत्या. त्यांच्यावर मकोकानुसार खटला दाखल झाला पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी शनिवारी येथे माध्यमांसोबत बोलताना केली.

रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी माझी बदनामी करणाऱ्यांना मी कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशारा दिला. हा इशारा सुषमा अंधारे यांनाच होता, यावर सुषमा अंधारे म्हणाल्या की, बुंद से गयी वो हौदसे नही आती. रुपाली चाकणकर अजूनही डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नात आहेत. मी चुकीच्या तारखा सांगून फोटो दाखवल्याचे चाकणकर म्हणतात. त्यांनी आता त्यांची एकही पोस्ट डिलीट करु नये. माझ्याकडे जे फोटो आणि तारखा आल्या ते मी दाखवले. मी रुपाली चाकणकरांचा हाताचे बोट कापलेला फोटो सप्टेंबरचा असल्याचे म्हटले होते. त्याच्या काही दिवस आधी सोमवती अमावस्या होती, एवढेच मी म्हटले होते. पण रुपाली चाकणकर सध्या दु:खी असल्याने सैरभैर झाल्या आहेत.

500 ते 600 कोटींची माया जमवली

सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा आरोप केला, त्या म्हणाल्या की, त्यांनी आतापर्यंत 500 ते 600 कोटींची संपत्ती जमावली आहे. सुनील तटकरे यांच्यासारख्या प्रभृतींचा त्यांना आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांचा अहंकार इतक्यात जाणार नाही, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें