घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कचरा डेपो रस्त्यावर दुचाक्या घसरतायत

कोथरुड कचरा डेपो परिसरात कचरा गाड्यांमधून सांडलेल्या द्रवामुळे रस्त्यावर घसरडी परिस्थिती निर्माण झाली असून दुचाकीस्वार घसरून अपघात होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून लिचेट (कचऱ्यातून बाहेर पडणारा द्रव) रस्त्यावर सांडत आहे. त्यामुळे रस्ता अत्यंत घसरडा झाला असून अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.

या धोकादायक परिस्थितीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून आवश्यक उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांना या मार्गावरून जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेकडून कचरा गाड्यांमधून लिचेट बाहेर पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असतानाही अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें