पुणे विमानतळावरून दरमहा सरासरी 10 ते 15 मेट्रिक टन आंतरराष्ट्रीय, तर साडेतीन ते साडेचार हजार मेट्रिक टन देशांतर्गत मालवाहतूक होते. वार्षिक विचार करता, आंतरराष्ट्रीय स्तरावर 123 टन आणि देशांतर्गत 40 ते 50 हजार टन अशी एकूण 50 ते 51 हजार टनांच्या घरात मालवाहतूक येथून यशस्वीपणे पार पडते.
पुणे विमानतळ फक्त प्रवाशांच्या सेवेसाठीच नाही, तर जागतिक व्यापार आणि मालवाहतुकीचे (कार्गेा) महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने पुढे येत आहे. पुणे विमानतळावरील कार्गेा विभागाच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करीत विमानतळावरून होणारी मोठी उलाढाल आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
विमानतळाच्या कार्गेा विभागातून प्रामुख्याने ताजी फळे, भाजीपाला, फुले आणि डे-ओल्ड चिक्स (कोबड्यांची पिले) यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. यासोबतच टाटा मोटर्स, कॅटरपिलर, कमिन्स, महिंद्रा आणि मर्सडीिज यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे ऑटो पाट्र्स येथून परदेशात पाठवले जातात. ई-कॉमर्स आणि पोस्ट ऑफिस कार्गेाची सेवाही आता येथे सुरू झाली आहे.
विमानतळावरील एकाच दिवसातील मालवाहतूक (दि. 18 ते 19 मार्च 2026)
अवघ्या 24 तासांतील आकडेवारी पाहता, पुणे विमानतळावर 106.97 मेट्रिक टन माल आला (इनबाऊंड कार्गेा), तर 90.14 मेट्रिक टन माल बाहेर (आऊटबाऊंड कार्गेा) पाठवण्यात आला. यामध्ये 1,560 किलोग््रॉम आंतरराष्ट्रीय निर्यातीचा समावेश होता.संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळपुणे विमानतळ कार्गेा क्षमतेचा पूर्ण क्षमतेने वापर करत असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रक्रियेत वेग आला आहे.
उद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी ही व्यवस्था वरदान ठरत आहे. पुण्याच्या वाढत्या विस्तारामुळे कार्गेाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आगामी काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.












