घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

छ. संभाजीनगरात गाड्यांचे गोडाऊन पेटले

शहरातील पैठण रोडवरील कांचनवाडी परिसरात असलेल्या पगारिया ऑटोच्या गोडाऊनला आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमध्ये उभ्या असलेल्या शेकडो नवीन रिक्षा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.

आगीचा भडका इतका मोठा आहे की, धुराचे लोट पैठण रोडवरून मैलोन्मैल अंतरावरून दिसत आहेत.ज्या ठिकाणी आग लागली, तिथे सुमारे १०० हून अधिक नवीन एलपीजी रिक्षा पार्क होत्या. आगीची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी आणि पगारियाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

जीवाची पर्वा न करता अनेकांनी पेटत्या गोडाऊनमधून रिक्षा बाहेर काढल्या, ज्यामुळे मोठा स्फोट होण्याचा धोका टळला. सध्या अग्निशमन दलाचे अनेक बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उष्णता आणि इंधनामुळे आगीचा भडकाघटनेची माहिती मिळताच माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी घटनास्थळी धाव घेतली. “नवीन गाड्यांमध्ये असलेल्या इंधनामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे आगीचा भडका वाढत आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

तासाभरानंतरही आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवता आलेले नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें