घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

भटक्या श्वानांचा प्रश्न कायम; पुण्यात ‘डॉग पार्क’ योजनेवरून वाद

शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांमध्ये श्वानांची दहशत असताना महापालिकेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यातच आता पाळीव श्वानांसाठी महापालिकेने ‌’डॉग पार्क‌’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.भटक्या श्वानांच्या लसीकरणाची मोहीम अपूर्ण असताना, पाळीव श्वानांसाठी मात्र ‌’डॉग पार्क‌’च्या माध्यमातून चंगळ होणार असल्याचा विरोधाभास पाहायला मिळत आहे.

सुरुवातीला कात्रज येथील प्राणिसंग््राहालयाजवळ ‌’डॉग पार्क‌’साठी जागा निश्चित करण्यात आली होती. केंद्रीय प्राणिसंग््राहालय प्राधिकरणाने महापालिकेला कात्रज प्राणिसंग््राहालयाजवळ तसेच बाणेर येथे ‌’डॉग पार्क‌’ उभारण्यासाठी परवानगी नाकारली. त्यामुळे आता महापालिकेच्या आरोग्य विभागाने खराडीमध्ये ‌’डॉग पार्क‌’ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हैदराबादच्या धर्तीवर स्वतंत्र ‌’डॉग पार्क‌’ उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे.

अद्ययावत आणि सुसज्ज ‌’डॉग पार्क‌’ उभारण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकावर 13 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुसरीकडे, मायक्रोचिपसाठी 50-55 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हाच निधी गाड्यांची संख्या आणि मनुष्यबळ वाढवणे, लसीकरणाची मोहीम जलद गतीने पूर्ण करणे, यासाठी वापरल्यास रेबीजमुक्त पुण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे.

डॉग पार्क‌’मध्ये काय असणार?

डॉग पार्कमध्ये जॉगिंग ट्रॅक, श्वानांना खेळण्याची जागा, स्विमिंग पूल आणि पार्किंगची सुविधा देण्याचा मानस आहे. कुत्र्यांसाठी फिरण्याची सोय, खेळणी, दवाखाना, डॉग पाँड अशा सुविधा नाममात्र दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सध्या महापालिका हद्दीत 8000 नोंदणीकृत पाळीव कुत्री आहेत.

डॉ. सारिका फुंडे-भोसले, पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिकाअनेकांसाठी श्वान हा केवळ पाळीव प्राणी नसून एक साथीदार, मित्र, कुटुंबातील सदस्य असतो. त्यामुळे ‌’डॉग पार्क‌’सारख्या सुविधांची गरज आहे. यासाठी प्रस्ताव दिला आहे. देशातील काही शहरांमध्ये अशी उद्याने आधीपासूनच अस्तित्वात आहेत. त्याच धर्तीवर पुण्यात ‌’डॉग पार्क‌’ सुरू करण्याचा मानस आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें