घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

गॅस पाइपलाइनसाठी केंद्राची नवी नियमावली

केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणाला गती देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत नवीन आदेश काढला आहे. गॅस पाइपलाइन टाकणे, देखभाल, विस्तार आणि संबंधित सुविधा उभारणीसाठी एक सुसंगत नियमावली लागू केली आहे.त्यामुळे विनाअडथळा खोदकाम करता येणार आहे.

केंद्र सरकारच्या आदेशामुळे घरगुती ग्राहकांना पाइपद्वारे नैसर्गिक गॅस (पीएनजी) पुरवठा वाढवण्यावर भर दिला असून, एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा उद्देश आहे. ज्या भागांमध्ये नैसर्गिक गॅस पाइपलाइन उपलब्ध आहे, तेथे एलपीजीऐवजी पीएनजी वापरास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

याबाबत ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन कोअर कमिटी सदस्य अली दारूवाला यांनी सांगितले, की पाइपलाइन टाकताना विविध परवानग्या, जास्त शुल्क, जमीन उपलब्धतेतील अडचणी आणि रहिवासी संघटनांकडून होणारा विरोध, यामुळे प्रकल्पांमध्ये विलंब होत होता. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी नवीन नियमांमध्ये परवानगी प्रक्रिया सुलभ केली आहे.

या आदेशानुसार सार्वजनिक, तसेच खासगी क्षेत्रातील संस्थांना ठराविक कालमर्यादेत पाइपलाइनसाठी परवानगी देणे बंधनकारक राहणार आहे. तसेच, परवानगी वेळेत न दिल्यास ती ‘स्वतःच मंजूर’ झालेली मानली जाईल, अशी तरतूद केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, निवासी भागांमध्ये पाइपलाइन टाकण्यास कोणीही अडथळा निर्माण करू शकणार नाही. जर नागरिकांनी पीएनजी कनेक्शन घेण्यास नकार दिला, तर ठराविक कालावधीनंतर त्या ठिकाणी एलपीजीपुरवठा बंद करण्याची तरतूदही केली आहे.

आदेशातील महत्त्वाचे मुद्दे

सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील संस्थांना ठरावीक कालमर्यादेत पाइपलाइनसाठी परवानगी देणे बंधनकारक

परवानगी वेळेत न दिल्यास ती ‘स्वतःच मंजूर’ झालेली मानली जाईल

निवासी भागांमध्ये पाइपलाइन टाकण्यास कोणीही अडथळा निर्माण करू शकणार नाही

नागरिकांनी पीएनजी कनेक्शन घेण्यास नकार दिला, तर ठरावीक कालावधीनंतर तेथे पुरवठा बंद होईल

पाइपलाइन गॅसचे प्रमुख फायदे

सतत आणि अखंड गॅस पुरवठा मिळतो

सिलिंडर संपण्याची किंवा उशीर होण्याची समस्या राहत नाही

गॅस गळतीची त्वरित माहिती देणारी यंत्रणा असल्याने सुरक्षितता अधिक

खर्चाच्या दृष्टीने दीर्घकालीन फायदेशीर

वाहतूक व सिलिंडर बदलण्याचा अतिरिक्त खर्च टळतो

जागेची बचत होते, कारण सिलिंडर साठवण्याची गरज राहत नाही

जितका वापर तितकाच खर्च, तुलनेने कमी प्रदूषण

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें