घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पिंपरी-चिंचवडच्या पाणीटंचाईवर आमदार अमित गोरखे आक्रमक!

पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्या तुलनेत अपुरा पडणारा पाणीपुरवठा या गंभीर विषयावर आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत आवाज उठवला आहे. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अतिरिक्त ३० एम.एल.टी. पाणीसाठा मंजूर करावा आणि आंध्र धरण प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून सभागृहात केली.

यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड हे राज्याचे महत्त्वाचे औद्योगिक आणि निवासी केंद्र आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरा पडत आहे. यामुळे नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख मागण्या

-३० एम.एल.टी. अतिरिक्त पाणीसाठा: पुणे महानगरपालिकेकडे सध्या वर्ग होत असलेला ३० एम.एल.टी. पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहरासाठी मंजूर करण्यात यावा, जेणेकरून नागरिकांची तात्पुरती गरज भागेल.

-जॅकवेल प्रकल्पासाठी जागा: आंध्र धरण परिसरात सिंचन विभागाची सुमारे अडीच एकर जागा उपलब्ध झाल्यास, त्या ठिकाणी जॅकवेल प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करता येईल.

-दीर्घकालीन उपाययोजना: जॅकवेल प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरासाठी दीर्घकालीन आणि मुबलक पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल, ज्यामुळे भविष्यातील पाण्याची चिंता मिटेल.

-आमदार गोरखे यांनी या विषयाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित विभागाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे. शहराच्या मूलभूत गरजांसाठी आपण सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार अमित गोरखे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें