घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मेट्रोला भगदाड पडल्यानंतर कडक नियम, प्रशासनाचा निर्णय

पुणे शहरातील शुक्रवार पेठ परिसरात खडक पोलीस स्टेशनच्या समोर एका वाड्याच्या बांधकामासाठी बोअरवेलची खोदाई सुरू असताना स्वारगेट ते शिवाजीनगर मार्गे असलेल्या मेट्रोच्या बोगद्याला भगदाड पडले.या भगदाडामुळे मेट्रोचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर मुंबई तसेच पुणे मेट्रो प्रशासन खडबडून जागे झाले आहे. यापुढे भूमिगत मेट्रोच्यावर असलेल्या सगळ्या बांधकामांसाठी नवीन नियमावली तयार करणार असल्याचे समोर आले आहे.

बांधकामांसाठी नवीन नियमावली!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात खडक पोलीस स्टेशनच्या समोर एका वाड्याच्या बांधकामासाठी बोरवेलची खोदाई सुरू असताना स्वारगेट ते शिवाजीनगर मार्गे का असलेल्या मेट्रोच्या बोगद्याला भगदाड पडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना वॉटर डिटेक्ट झाल्यावर त्यांनी थेट घरमालक असलेल्या धनंजय मोठे आणि ठेकेदार जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केला. या घडलेल्या घटनेनंतर महापालिका आणि मेट्रो प्रशासन खडबडून जागे झाले.

पेठांमधील परिसरात अनेक ठिकाणी कन्स्ट्रक्शनची काम सुरू आहेत आणि अनेक वाड्यांचा प्रश्न देखील प्रलंबित आहेत. त्यामुळे येत्या काळात मेट्रोच्या बोगद्याच्यावर असलेले सगळे वाडे आणि इमारती बांधण्यासाठी महापालिका नवीन नियमावली आणणार आहेत. त्यासोबतच भूजल विभागाकडून बोरवेल खोदण्यासाठी वेगळी परवानगी देखील घ्यावी लागणार असल्याची माहिती आहे.

ठेकेदार बोरवेल बांधत असताना फक्त बांधकामाची परवानगी घेतो आणि त्यासोबतच बोरवेलची देखील खोदाई करतात. पण आता ठेकेदारांना आणि घरमालकांना देखील बांधकाम करताना वेगवेगळ्या परवानगी घेण्याची गरज भासणार आहे. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. या प्रकाराबाबत आम्ही नवीन नियमावली लवकरच सादर करू आणि शहराच्या मेट्रोचा जो प्रकल्प आहे त्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेऊ असं मत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केले.

मुंबई, मेट्रो प्रशासनाचाही मोठा निर्णय!

पुण्यानंतर मुंबई मेट्रो प्रशासनानेही इमारतींच्या पुनर्विकासासाठी मेट्रो रेल्वे प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सूचनापत्र काढले आहे. ‘मुंबई मेट्रो लाइन-३’ चे अंदाजे ६.३५ मीटर व्यास असलेले दोन (२) बोगदे, अंदाजे २०-२२ मीटर अंतरावर व जमिनीपासून १७-२५ मीटर खोलवर असून, मुंबई मेट्रो लाईन-३ सरखनाच्या (नकाशात दाखवल्याप्रमाणे) दोन्ही बाजूस काही स्थावर मालमत्तेच्या खाली येत आहेत.

या क्षेत्रात कोणत्याही विकास/पुनर्विकासामुळे मेट्रो बोगदे, जमिनीच्यावर व खालील मेट्रो संस्थानांवर होणारा कोणताही प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी, मुंबई मेट्रो लाईन-३ क्षेत्रात येणारे विकासक यांनी कोणताही विकास / पुनर्विकास सुरू करण्यापूवी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) कडून मंजुरी घेणे अनिवार्य आहे, असं प्रशासनाने म्हटलं आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें