घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

फक्त 200 रुपयांचेच पेट्रोल मिळणार, सरकारचा थेट आदेश आला

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतात उर्जासंकट निर्माण झालं आहे. घरगुती गॅस महागला आहे. गॅस बुकिंग करूनही तो वेळेवर मिळत नाहीये. मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारच्या घटना वाढत आहेत.

महाराष्ट्रातही गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत काळ्या बाजाराची काही प्रकरणं समोर आली आहे. दुसरीकडे अनेक अफवांचेही पेव फुटले आहे. गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. सोबतच पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठाही खंडीत होणार आहे, अशी अफवा अनेक ठिकाणी पसवरली जात आहे.

त्यामुळे कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात काही ठिकाणी पेट्रोलच्या विक्रीत 30 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. असे असतानाच आता प्रशासनाचा एक मोठा निर्णय समोर आला आहे. आता प्रत्येक दुचाकीसाठी फक्त 200 रुपयांचेच पेट्रोल मिळेल, असा सरकारी आदेश काढण्यात आला आहे.

फक्त 200 रुपयांचे पेट्रोल मिळणार

हा आदेश कोल्हापूर प्रशासनाने काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाकडून दुचाकीसाठी 200 रुपये तर तीन चाकी आणि चार चाकी वाहनांसाठी दोन हजार रुपये पेट्रोल विक्रीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात वाढपेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे समतोल साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल पंप चालकांना देण्यात आली आहे.कोल्हापुरात नेमका काय घोळ झाला?सध्याच्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल बंद होणार असल्याची अफवा पसरली. त्यामुळे कोल्हापुरातील पेट्रोल पंपांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्द झाली.

अचानकपणे कोल्हापुरात पेट्रोल, डिझेलची विक्री प्रचंड वाढली. हे प्रमाण रोजच्या विक्रीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळेच कोल्हापुरात पेट्रोल संपल्याने शहरासह उपनगरातील पेट्रोल पंप ठेवण्यात आले होते. इंधन वितरणाचा मोठा असमतोल निर्माण झाला. त्यामुळेच आता हा गोंधळ पुन्हा उडू नये यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. दरम्यान, हा निर्णय फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे. तो महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांसाठी लागू नसेल.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें