घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार

भोंदूबाबा अशोक खरात त्याच्या करारनाम्यामुळे चर्चेत असताना आता एका स्वयंघोषित गुरूने पुण्यातील महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार ऋषिकेश वैद्य असं त्याचं नाव असून तो वसाईत राहतो.त्याच्याविरोधात वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं असून अधिक तपास केला जात आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडिता ३५ वर्षांची असून ती पुण्यात राहते. २०२३ मध्ये महिलेची ओळख वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्याशी सोशल मीडियावरून झाली होती.

तो आमची वसई या संस्थेचा प्रमुख आहे. पीडितेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने ओळख वाढवली. तिला डिसेंबर २०२३ मध्ये भेटण्यासाठी पुण्यात गेला होता.

ऋषिकेश वैद्य याने महिलेला मी महादेवाचा अवतार आहे तर तू माझी पार्वती असल्याचं सांगत भूलथापा देत जाळ्यात ओढलं. तिला पुण्यातील एका लॉजवर नेत गुंगीचे पदार्थ दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले आणि अश्लील फोटोही काढले. याच फोटोंचा वापर करून ब्लॅकमेल करत भेटायला बोलावल्याचा आरोप महिलेनं केलाय.

पीडितेला मे २०२५मध्ये ऋषिकेश वैद्य यानं वसईतल्या हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं होतं. तिथं महिलेसोबत त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. वैद्यच्या धमकीमुळे महिला गप्प होती.

आता खरात प्रकरण बाहेर येताच धाडसाने पीडितेनं तिच्यावर झालेल्या प्रकाराची माहिती पतीला दिली. बुधवारी सायंकाळी पतीसह पोलीस ठाणे गाठत महिलेनं ऋषिकेश वैद्यविरोधात तक्रार दाखल केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें