घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

ध्वजारोहण, सामाजिक उपक्रम आणि बालकार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा

पुणे | प्रतिनिधी
दि. २६ जानेवारी २०२६ रोजी देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन पुणे शहर व परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि देशभक्तीपर उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ८.०० वाजता पुणे ग्रामीण विभाग – पाषाण येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास वसुधा वैभव नाईक उपस्थित होत्या. हा कार्यक्रम ग्रामीण विभागातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) शिवहरी जंगले यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याने त्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यानंतर सकाळी सुमारे ९.३० वाजता घरी परतल्यानंतर त्यांना एक आनंददायी आश्चर्य अनुभवायला मिळाले. त्यांच्या राहत्या सोसायटीमध्ये आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात त्यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्याचा मान देण्यात आला. आयुष्यात एकदा तरी स्वतःच्या हातून ध्वजावंदन व्हावे, ही मनातील इच्छा या निमित्ताने पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या सन्मानाबद्दल त्यांनी सोसायटी कमिटीचे विशेष आभार मानले.
त्यानंतर सकाळी ठीक ११.०० वाजता पुढील सामाजिक उपक्रमासाठी त्या कात्रज येथील रात्र शाळेत दाखल झाल्या. ही शाळा योगेश हरणे व त्यांच्या मित्रांच्या पुढाकाराने चालवली जाते. येथे लहान मुलांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रभात फेरी काढून मुलांना प्रभात फेरीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षकांना ‘कहाण्या ज्ञानदीपांच्या’ हे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले. या उपक्रमासाठी योगेश हरणे यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांनंतर सामाजिक बांधिलकी जपत वसुधा नाईक यांच्या हस्ते २५ साड्यांचे वाटप करण्यात आले. समाजोपयोगी कार्याची ही संधी न सोडता त्यांनी प्रजासत्ताक दिन अधिक अर्थपूर्ण केला.
संध्याकाळच्या सत्रात त्यांच्या सोसायटीमध्येच आयोजित करण्यात आलेल्या मुलींच्या भजन कार्यक्रमाचा त्यांनी आस्वाद घेतला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने दिवसाची सांगता झाली.
अशा विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून यंदाचा प्रजासत्ताक दिन अत्यंत सुंदर आणि संस्मरणीय पद्धतीने साजरा झाल्याचे त्यांनी सांगितले.
— वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा – पुणे
मो. नं. ९८२३५८२११६

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें