घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अविवाहिता घरातच बाळंत; दोघांचाही मृत्यू

अविवाहित तरुणी घरातच बाळंत झाली. दरम्यान, नवजात बाळ रावेत आणि तरुणीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.24) चिंचवड येथे उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथे राहणारी 22 वर्षीय अविवाहित तरुणी अज्ञातापासून गरोदर होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ती बाळंत झाली. त्यानंतर तरुणीची प्रकृती अचानक खालावली. तिला उपचारासाठी रावेत येथील एका खासगी रुग्णालयात बाळासह दाखल करण्यात आले.

तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तरुणीला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. दरम्यान, बाळाचीदेखील प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तसेच, तरुणीचीही प्रकृती आणखी खालावल्याने तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें