घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

त्याच्याकडे गेलेल्या महिलांनाही जाब विचारा.”, खरात प्रकरणावर ममता कुलकर्णीनं केले भाष्य

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणात रोज नवनवीन आणि भयंकर अशा धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकेकाळची अभिनेत्री आणि आता आध्यात्मिक क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या ममता कुलकर्णीनेही या प्रकरणावर भाष्य केले.

अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या कार्यालयात लावण्यात आलेल्या छुप्या कॅमेऱ्यात त्याचे काळे धंदे कैद झाले. या लैंगिक शोषणाबद्दल ममता यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, खरातसारख्या माणसाने निष्पाप स्त्रियांवर खूप अत्याचार केला.

मी अशा महिलांच्या पतींना आवाहन करेन की, तुम्ही आपल्या पत्नींना सांभाळा.ममताने पुढे म्हटले की, खरातच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांनाही प्रश्न विचारायला हवा. त्या निष्पाप नक्कीच आहेत.

पण त्या खरातकडे ज्योतिष पाहायला गेल्या होत्या की इतर कारणांसाठी? जर त्याने मर्यादा ओलांडली होती, तर तुम्ही तिथेच त्याला लाथ मारायला हवी होती. मी हात दाखवायला आले आहे, हे करायला नाही, असे ठामपणे सांगायला हवे होते.

तुमच्या अंगाला हात लावला तर तिथेच त्याला एक लावून द्यायला हवी होती. आपण मराठी आहोत. अशा भोंदूंना बळी पडायला नको, असेही अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी खडसावून सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें