घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

कर्वेनगर परिसरातील महापालिकेच्या आरक्षित जागेवर खासगी स्वरूपाची ‘खाऊगल्ली’ उभारण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या जागेचा ताबा महापालिकेकडे असतानाही एका लोकप्रतिनिधीच्या पुढाकाराने येथे व्यावसायिक स्टॉल थाटण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

कर्वेनगरमधील डी.पी. रस्त्यालगत सर्व्हे क्रमांक ११/२ व सर्व्हे क्रमांक ६ मध्ये महापालिकेची आरक्षित जागा आहे. या जागेचा टीडीआर (विकास हक्क हस्तांतरण) घेतल्यानंतर ती महापालिकेच्या मालकीची झाली आहे. मात्र, या जागेवर सध्या लाकडी संरचना, आकर्षक प्रवेशद्वार आणि इतर साहित्य वापरून खाऊ गल्ली तयार केलेली आहे.

या प्रकरणावरून स्थानिक नागरिक दिनकर कोतकर यांनी आक्षेप नोंदवला असून, सार्वजनिक जागेचा वापर खासगी आर्थिक फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला आहे.या खाऊ गल्लीतील स्टॉलधारकांकडून भाडे वसूल केले जात असून, त्यातून संबंधित लोकप्रतिनिधी आर्थिक लाभ घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेवर अशा प्रकारचे व्यावसायिक उपक्रम राबवण्यासाठी अधिकृत परवानगी घेतली आहे का, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.

आरक्षित जागेचा वापर सार्वजनिक सोयींसाठी होणे अपेक्षित असताना तेथे खासगी व्यवसाय सुरू झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी आहे.नागरिकांनी याप्रकरणी महापालिकेकडे चौकशीची मागणी केली आहे. प्रशासनाने या जागेची पाहणी करून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी आणि सार्वजनिक मालमत्ता पुन्हा ताब्यात घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

“या अतिक्रमण झालेल्या आरक्षित जागेची पाहणी झाली असून, अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व्हे क्रमांक ११/२ मधील अतिक्रमण काही प्रमाणात काढले गेले असून, सर्व्हे क्रमांक ६ चे अतिक्रमण लवकरच काढण्यात येईल. इतर आरक्षित जागेवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई तातडीने करणार आहे.”

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें