घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे शहर टीडीएफच्या सर्व कार्यकारणीच्या निवडी जाहीर

पुणे शहर टीडीएफ माध्य.शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक कार्यकारिणीची निवडणूक आझम कॅम्पस, पुणे येथे राज्याचे अध्यक्ष जी.के. थोरात व सचिव के. एस. ढोमसे यांच्या प्रमुख उपस्थितीत व विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव कामथे व सचिव सचिन दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी पुणे शहर टीडीएफ व माध्य. शिक्षक संघाच्या सर्व सेलच्या त्रैवार्षिक कार्यकारणी जाहीर करण्यात आल्या.

पुणे शहर टीडीएफच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा प्रा.संतोष थोरात तर सचिव पदी संदीप घोलप यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी ही शिक्षकांसाठी कार्यरत असणारी १९६२ साली स्थापन झालेली सर्वात जुनी संघटना असून संघटनेच्या माध्यमातून नेहमीच शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाते.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवडीनंतर बोलताना स्पष्ट केले की येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये संघटनेची चांगली बांधणी करून शाळा तिथे संघटनेचा पदाधिकारी नेमून शिक्षकांच्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध असेल असे आश्वासन दिले.

यावेळी पुणे शहर जुनि. कॉलेज टीडीएफ माध्य. शिक्षक संघ, महिला टीडीएफ, महिला माध्य. शिक्षिका संघ, अंशतः अनुदानित टीडीएफ या सेलच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पंकज घोलप तसेच जिल्हा टीडीएफचे सचिव तानाजी झेंडे यांनी काम पाहिले.

पदाधिकारी निवडीनंतर राज्याचे अध्यक्ष जी.के. थोरात सचिव के.एस. ढोमसे तसेच विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव कामथे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये संघटनेसाठी चांगले कार्य करण्याचे आवाहन करून संघटनेचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले.

त्रैयवार्षिक कार्यकारणी पुढीलप्रमाणे.

*अध्यक्ष*-संतोष थोरात *कार्याध्यक्ष*- रोहिदास भारमळ *सचिव*-संदीप घोलप *सहसचिव*- अशोक धालगडे *उपाध्यक्ष*-दत्तात्रय बनकर, संजय सोनवणे, संभाजी साबळे, द्वारकानाथ दहिफळे, संजय भालेराव, सुनील गिरमे, दत्तात्रय हेगडकर, दिलीप कांबळे, शिवाजी मोरमारे*खजिनदार*- दीपक सोनवणे *सह खजिनदार*- सुधीर थोरात, रत्नाकर जाधव, मोहन राऊत*वार्ता संपादक*- संतराम इंदुरे *सहवार्ता संपादक*-रोहित डामरे, पाटेकर*राज्य प्रतिनिधी*- राज मुजावर, सुजित जगताप*जुनिअर कॉलेज टीडीएफ*अध्यक्ष-प्रा. शशिकांत शिंदे सचिव-प्रा. अरविंद मोडक *माध्यमिक शिक्षक संघ* अध्यक्ष-संतोष दुर्गाडे सचिव-प्रशांत आबने*पुणे शहर महिला टीडीएफ* अध्यक्ष-भारती राऊत सचिव-उज्वला हातागळे *महिला माध्यमिक शिक्षिका संघ* अध्यक्ष-डॉ. मंगल शिंदे सचिव-तृप्ती राऊत *अंशतः अनुदानित व विनाअनुदानित टीडीएफ*अध्यक्ष-बाळासो इमडे कार्याध्यक्ष-दिपक खैरेसचिव-बाळासाहेब ढोरमारे *शारीरिक शिक्षक टीडीएफ*अध्यक्ष-संजय कांबळे सचिव-धनंजय मदने *राज्य प्रतिनिधी* हर्षा पिसाळ, विजय कचरे

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें