घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे जिल्ह्यातील वरंधा घाटातील अपघातात ११ जखमी

वरंधा घाटमार्गे अंत्यविधीसाठी महाडकडे जाणाऱ्या टेम्पोला शिरगाव (ता. भोर) हद्दीत रविवारी (ता. २९) सकाळी अपघात झाला. मातीवरून चाके घसरल्याने टेम्पो रस्त्याशेजारील खड्ड्यात गेला.यात ११ जण जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

किवत (ता. भोर) येथील १२ प्रवासी छोट्या टेम्पोने (एमएच १३ क्यूडब्ल्यू ५८०६) सकाळी सातच्या सुमारास महाडकडे निघाले होते. दीड तासाच्या प्रवासानंतर शिरगावजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो मोरीच्या खड्ड्यात अडकला. अपघाताची माहिती मिळताच शिरगावचे ग्रामस्थ दत्ता पोळ, श्रेयश भेलके व इतरांनी मदतीसाठी धाव घेतली.

जखमींना तातडीने हिर्डोशी आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील वसंत तात्याबा पवार (७५) यांच्या हात-पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले.

भोर पोलिसांनी रुग्णालयात जखमींची चौकशी केली; क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाहेर काढण्यात आले आहे.जखमींची नावेबायडाबाई बाबुराव कुमठे, साधना संजय कुमठे, छबुबाई साहेबराव हगवणे, सुगंधाबाई तुकाराम कुमठे, मीना शंकर भानसे, गौरी योगेश कुमठे, शकुंतला नाना पवार, उर्मिला अशोक भानसे, शारदा अशोक कुमठे, सुलाबाई बाळू पवार, वसंत तात्याबा पवार (रा.सर्व किवत) यातील चारपाच जण सोडले तर बाकी किरकोळ जखमी आहेत. भोर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें