घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग?

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असताना आता शिक्षण विभागाशी संबंधित आणखी एक गंभीर मुद्दा समोर आला आहे. राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये देखील अशोक खरात असल्याचे समोर आले आहे.

अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, 2022 साली शिक्षणमंत्री दीपक केसरकर असताना यांच्या कार्यकाळात अशोक खरातने आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भोंदू बाबा अशोकचा भाऊ दिलीप खरात हा सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात शिक्षण विभागात अशीही चर्चा आहे की, तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मध्यस्थी करत हा आयडी मिळवून देण्यात आला. त्यामुळे दिलीप खरातचा शालार्थ आयडी खरा की बोगस, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय अशोक खरातने आपल्या राजकीय वजनाचा वापर करून शिक्षण विभागातील अनेक फाईल्स पास केल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें