घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त काव्यस्पर्धेचा रंगतदार उत्सव

पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने आयोजित काव्य स्पर्धा मंगळवार, दि. २७ जानेवारी २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडली.

दरवर्षी मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन करण्याच्या उद्देशाने १४ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा केला जातो. या पंधरवड्यानिमित्त सदर काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या काव्य स्पर्धेत पुणे शहरासह शहराबाहेरील अनेक कवींनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत प्रथम क्रमांक संजय जाधव यांनी, द्वितीय क्रमांक सुजित कदम यांनी तर तृतीय क्रमांक संतोष गाढवे यांनी पटकावला. विजेत्या कवींना यावेळी रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेसाठी ज्येष्ठ कवी वि. ग. सातपुते आणि कवयित्री घाणेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

पुणे महानगरपालिका माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मा. आशा उबाळे यांनी स्पर्धकांचे स्वागत करत काव्य स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देशाची माहिती दिली.

गोपाळ कांबळे यांनी या काव्य स्पर्धेचे प्रभावी सूत्रसंचालन केले.या काव्य स्पर्धेत खेताराम परीयारिया, रा.वि. शिशुपाल, संतोष गाढवे, रमेश जाधव, सुजित कदम, मिनाक्षी शिलवंत, वृंदा भांबुरे, दाक्षायणी पंडीत, ज्योती हमीने, संजय माने, अमोल सुपेकर, विनोद अष्टुळ, आशा यमगर, संजय जाधव आदी कवींनी सहभाग घेतला. मानवी संवेदना, प्रेम, निसर्ग, दुःख, विरह तसेच विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या कविता सादर करण्यात आल्या.

न्याय, ऊसतोड, कुटुंब पद्धती, झाड, माय मराठी, सांगावा, जगून घे थोडं, प्राण आहे मायभूमी, सखी, कथा, सोळा ऑगस्ट ओरडला, माझी शाळा – माझी मुले माझे हिरो अशा विविध विषयांवरील कवितांनी श्रोत्यांची मने जिंकली.यावेळी परीक्षक वि. ग. सातपुते यांनी आपल्या काव्यप्रवासातील अनुभव कथन करत तीन रचना सादर केल्या. आभार प्रदर्शनाने या काव्य स्पर्धेची सांगता झाली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें