उंब्रज (ता. जुन्नर) येथील अक्षय यशवंत शिंगोटे (वय-२८) व त्यांची पत्नी प्राजक्ता शिंगोटे (वय-२५) हे दांपत्य सोमवारी (ता. ३०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काळवाडी (ता. ३०) येथे कुकडी डाव्या कालव्यात बेपत्ता झाले आहेत.त्यांनी कालव्यात उडी मारली की ते वाहून गेले, याचा तपास सुरू आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, एका लहान मुलगा कालव्याच्या कडेला त्याच्या आई व वडिलांना रडत हाक मारत होता. ते पाहून आम्ही त्याच्याजवळ गेलो असता त्याठिकाणी चपला आमच्या निदर्शनात आल्या.
तसेच, पाण्यात पाहिले असता दोघेही पाण्यात वाहून जाताना दिसले.या घटनेची माहिती आळेफाटा पोलिसांना कळवली असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
कालव्याला पाणी जास्त असल्याने त्यांचा शोध घेणे अवघड होत होते. शिंगोटे यांच्या घरच्यांनी व उंब्रजचे सरपंच हिरामण शिंगोटे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. कुकडी डाव्या कालव्यात या दांपत्याचा शोध सुरू आहे.












