घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वडिलांसोबतच्या वादातून चिमुकल्यावर क्रूर हल्ला

रागाच्या भरात माणूस किती क्रूर होऊ शकतो, याचा विदारक अनुभव वसईकरांना आला आहे. एका किरकोळ वादाचे पर्यावसान चार वर्षांच्या लहान मुलावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात झाले आहे.वसई पश्चिमेतील ‘अनुपम घर संकुल’ सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही (CCTV) व्हिडिओ पाहून कोणाचेही काळीज पिळवटून निघेल.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप पवार याचे एका व्यक्तीशी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून संदीपने संधी साधली आणि त्या व्यक्तीच्या 4 वर्षांचा मुलगा विघ्नेश जेव्हा सोसायटीच्या आवारात खेळत होता, तेव्हा त्याला पकडले. त्यानतंर आरोपी संदीपने विघ्नेशचे डोके रिक्षाच्या लोखंडी अँगलवर जोरात आपटले. त्यानंतर मुलाचा पाय धरून त्याला हवेत भिरकावले आणि जमिनीवर आपटले. इतक्यावरच न थांबता, त्याने त्या निष्पाप जीवाला फरफटत नेल्याचाही आरोप आहे.

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वसई परिसरात संतापाची लाट उसळली आहे. वसई पोलिसांनी या प्रकरणाची त्वरित दखल घेत आरोपी संदीप पवार याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न आणि बालकांवरील अत्याचाराच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें