घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जिल्हा परिषद शाळा नागेवाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

वाई | प्रतिनिधी प्रशांत थोरवे

जिल्हा परिषद शाळा, नागेवाडी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. शाळेचा ध्वजारोहण समारंभ शाळेचा आदर्श विद्यार्थी शाहीर साई विशाल सणस (इयत्ता सातवी) यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी संगीत कवायत सादर केली तसेच विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे सजीव सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रमात आदर्श विद्यार्थी पुरस्कार शाहीर साई विशाल सणस याला सरपंच साहेबराव सणस, पोलीस पाटील दीपक बनसोडे आणि ग्रामस्थांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी असाक्षर मुक्त गाव व मतदान जनजागृती या विषयांवर शपथ घेण्यात आली.

अनेक पालकांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊचे वाटप केले. यानंतर विद्यार्थ्यांनी जयंत नारळीकर प्रयोगशाळेची पाहणी करून विविध शैक्षणिक प्रयोग स्वतः करून दाखवले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि प्रयोगशीलता पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक शरद यादव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. जगदाळे सर यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती दिपाली भोसले यांनी केले. कार्यक्रमासाठी सरपंच साहेबराव सणस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंजली सणस, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन व सर्व सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. पोलीस पाटील दीपक बनसोडे यांनी शाळेसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली. तसेच *वसुंधरा* उपक्रमांतर्गत उत्कृष्ट झाडांची जोपासना करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना विद्या जाधव यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सतीश जाधव यांनी त्यांची मुलगी आर्या जाधव हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना ट्रॅकसूट व स्पोर्ट्स किट देण्याची घोषणा केली. राजश्री येवले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. गावातील तरुण मंडळाने शाळेसाठी लाऊडस्पीकर सेट देण्याची घोषणा केली. या कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शाळेच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें