घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

नरहरी झिरवळांचा व्हिडीओ कोणी व्हायरल केला? करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा

काही दिवसांपूर्वी मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान त्यावर नरहरी झिरवळ यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे, हा व्हिडीओ फेक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

या व्हिडीओवर आता करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, करुणा मुंडे यांनी या व्हिडीओबाबत मोठा दावा केला आहे. करुणा मुंडे यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नरहरी झिरवाळ यांचा व्हिडीओ धनंजय मुंडे यांनी व्हायरल केला असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.

त्यांना मंंत्रिपदावर जाण्याची घाई झाली आहे, त्यामुळे त्यांनी हा व्हिडीओ व्हायरल केल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.नेमकं काय म्हणाल्या करुणा मुंडे?नरहरी झिरवळ यांचा व्हिडीओ धनंजय मुंडे यांनी व्हायरल केला आहे. त्यांना मंत्रिपदावर जाण्याची घाई झाली आहे, त्यामुळे त्यांनी तो व्हिडीओ व्हायरल केला आहे. हा माझा दावा आहे, परंतु त्यांचं स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही.

नरहरी झिरवाळ यांचा व्हिडियो नेमका कसा व्हायरल झाला? याची सरकारने चौकशी करावी, धनंजय मुंडे यांची एसआयटी चौकशी करावी, धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट आणि सीबीआय चौकशी देखील करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना अजूनही काही गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केले आहेत. पहिलं लग्न माझ्याशी केलं, 2000 मध्ये 75 लाख रुपये घेऊन गेले. माझ्या हृदयाला छिद्र आहे, उपचारासाठी लंडनला जात आहे असे त्यांनी सांगितले. माझी आई तारामती शर्मा यांनी कोणाच्या दबावाखाली विष प्राशन केले आणि त्यांचा मृत्यू झाला? असा सवालही यावेळी करुणा मुंडे यांनी केला आहे.

2019 मध्ये मंत्री झाल्यानंतर या लोकांकडे कोट्यवधी रुपये कुठून आले? याची चौकशी व्हावी. राजश्री मुंडे, वाल्मिक कराड, राजू घवते, मोनिका सिंग, रेखा सिंग, स्वातिका शिरोडकर, लता पप्पी, अभय मुंडे, अज्या मुंडे यांच्या संपूर्ण कुटुंबाची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी करुणा मुंडे यांनी केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें