घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जिल्हा परिषद शाळा मुगाव येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

वाई | प्रतिनिधी प्रशांत थोरवे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुगाव येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लेकीसत्ताक प्रजासत्ताक म्हणून इयत्ता चौथीतील विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘जलवा तेरा जलवा’ या देशभक्तीपर गीतावर लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि शौर्य दर्शविणारे लाठी–काठी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध व प्रभावी सादरीकरणाचे मान्यवर व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. शाळेचे उपशिक्षक श्री. पडळकर यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

मुगाव गावच्या सरपंच सौ. सविता सोंडकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सुषमा महांगरे यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत शाळेच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर ‘असाक्षरमुक्त गाव’ व ‘मतदान जनजागृती’ या विषयांवर उपस्थित नागरिकांनी शपथ घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी पालकांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापिका सौ. थोरवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षक श्री. पडळकर यांनी केले. या कार्यक्रमास सरपंच सौ. सविता सोंडकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. गणेश दौंड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सुषमा महांगरे, उपाध्यक्ष श्री. महेश शिंदे, तसेच सौ. वैशाली फणसे, सौ. प्रिया महांगरे, सौ. अर्चना सोंडकर, सौ. रुचिता गोळे, सौ. अर्चना वैराट, सौ. सारिका चिरगुटे, बनुबाई शिंदे, सौ. लता कुंभार, सौ. मोहिनी कुंभार, सौ. साधना महांगरे, सौ. ऋतुजा सोंडकर, अंगणवाडी सेविका सौ. विमल फणसे व त्यांच्या सहकारी सौ. तस्लिम सय्यद, सौ. तृप्ती सोंडकर, तसेच श्री. सुमंत गायकवाड, श्री. रामचंद्र कुंभार, श्री. शंकर सपकाळ, श्री. दत्तात्रय मोझर आदी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें