घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अनिता अडवाणी राजेश खन्ना यांची पत्नी? मुंबई हायकोर्टाने दिला मोठा निकाल

अभिनेते राजेश खन्ना कायम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहेत. 2012 साली त्यांचं निधन झालं. आता त्यांच्या निधनानंतर 13 वर्षांनी त्यांचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा चर्चेत आलं आहे.राजेश खन्ना यांची चर्चित गर्लफ्रेंड अनिता अडवाणी यांचं राजेश खन्ना यांच्यासोबतच्या नात्याबाबत मुंबई हायकोर्टाने मोठा निकाल दिला आहे.

राजेश खन्ना यांच्या आयुष्यात डिम्पल कपाडिया आधी अनिता अडवाणी होती, असं तिने स्वत:च एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण तेव्हा मी खूप लहान असल्याने आम्ही लग्न केलं नाही. नंतर राजेश खन्ना जयपूरला गेले आणि तिथं डिम्पलशी लग्न केल्याचं ती म्हणाली होती.

12 वर्षे लिव्ह इनमध्ये राहत होतेअनिता अडवाणी मुलाखतीत म्हणाल्या होत्या ती, “जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी टिनएजर होते. मी एका पारंपरिक कुटुंबातून आले होते, त्यामुळे मला वाटायचं की ते माझे सर्वस्व आहेत. जसजशी मी मोठी होत गेले, तसतसे लोक माझ्या मागे लागले, पण मला दुसरा कोणीच दिसत नव्हता.

त्यांनी माझ्या हृदयावर आणि मनावर त्यांनी इतका खोल ठसा उमटवला की, मला त्याच्याशिवाय दुसरा कोणीही आवडला नाही. दुसऱ्या कोणत्याही पुरुषाने मला स्पर्श करावा असं मला वाटत नव्हतं””शेवटी जेव्हा त्याच्या आयुष्यातून सगळे निघून गेले, त्याच्याजवळ कुणीच नव्हतं तेव्हा आम्ही पुन्हा भेटलो.

आम्ही 12 वर्षे एकत्र होतो”, असं अनिता म्हणाल्या होत्या.डिम्पल कपाडियासोबत लग्न झाल्यानंतर राजेश खन्ना अनेक वर्षे अभिनेत्री अनिता अडवाणीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. अनिताने एका मुलाखतीत त्यांनी गुपचूप लग्न केल्याचंही सांगितलं होतं, “आमच्या घरात एक छोटं मंदिर होतं.

मी एक काळे मणी असलेलं सोन्याचं मंगळसूत्र बनवून घेतलं होतं. त्यांनी ते मला घातलं आणि माझ्या भांगेत सिंदूर भरत म्हणाले होते आजपासून तू माझी जबाबदारी. अशा पद्धतीने एका रात्रीत आमचं लग्न झालं. मी त्यांच्यासोबत आहे असं मीडियाने आधीच प्रसिद्ध केलं होतं, त्यामुळे आम्ही लग्न केल्याची जाहीर घोषणा करण्याची गरज आम्हाला कधीच वाटली नाही.”, असं तिने सांगितलं होतं.

राजेश खन्ना यांच्या शेवटच्या दिवसांतही अनिता त्यांच्यासोबत असल्याचं सांगितलं जातं.पत्नीचा दर्जा मिळण्यासाठी कोर्टात याचिकाराजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासोबतच्या आपल्या कथित संबंधांना विवाह म्हणून मान्यता मिळावी, यासाठी अनिताने कोर्टात एक याचिका दाखल केली होती.

राजेश खन्ना यांच्यासोबतच्या आपल्या नात्याला वैवाहिक दर्जा देण्याची मागणी तिने केली होती.मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने दिंडोशी न्यायालयाचा आधीचा निर्णय कायम ठेवला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें