घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

श्री.स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह उत्साहात संपन्न

वाई प्रतिनिधी | प्रशांत थोरवे

श्री.स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह 12 जानेवारी 2026 ते 19 जानेवारी 2026 उत्साहात संपन्न झाला. 12जानेवारी 2026 रोजी श्री.स्वामी विवेकानंद व प.पू.डॉ.बापूजी साळुंखे तसेच संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन धोम गावचे सरपंच श्री.सचिन कांबळे आणि श्री.संदीप फणसे (वरखडवाडी) यांच्या हस्ते पूजन करून सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय देसाई यांनी केले,यावेळी विद्यालयाचे शिक्षक श्री.कृष्णा कांबळे यांनी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावरती मार्गदर्शन केले.त्याचबरोबर यावेळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. श्री. स्वामी विवेकानंद यांच्या घोषणा देण्यात आल्या.सप्ताहाचे उत्साहात उदघाटन संपन्न झाले. दि.13 जानेवारी 2026रोजी प्रतिमेचे पूजन श्री.अशोक आप्पा मराठे (अध्यक्ष सल्लागार समिती) श्री.दामोदर फणसे (माजी सरपंच), श्री.सचिन दळवी( ग्रामपंचायत सदस्य)यांच्या हस्ते दुसरे पुष्प गुंफण्यात आले. या दिवशी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, (लहान गट /मोठा गट) घेण्यात आल्या दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी क्रीडा सामने,यांचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष प्रशांत पोळ यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या दिवशी जेष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. धोम,वरखडवाडी,अभेपुरी,भोगाव, पांडेवाडी, मेणवली येथील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या दिवशी राजस्थान येथून आलेले पाहुणे श्री.राजेंद्र शेलार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी माता पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील महिला उपस्थित होत्या.महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,रस्सीखेच स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा,घेण्यात आल्या तसेच पाककला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. विजेत्या महिलांचा सन्मान करण्यात आला. दिनांक 17 जानेवारी 2026रोजी विद्यालयामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य श्री.अभयकुमार साळुंखे सर यांचा वाढदिवस ‘ज्ञान शिदोरी दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्त्व श्री.चंद्रकांत धोंगडे सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी श्री.अशोक आबा मांढरे (सामाजिक कार्यकर्ते) श्री.विजय मांढरे (उपसरपंच अभेपुरी) श्री.संतोष आप्पा मांढरे (समाज कार्यकर्ते) उपस्थित होते.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दत्तात्रय देसाई यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. व या दिवशी विद्यालया मध्ये धावणे तसेच कबड्डी स्पर्धा, खो-खो स्पर्धा (लहान गट/ मोठा गट) घेण्यात आल्या होत्या. शेवटचे पुष्प गुंफण्यासाठी 19 जानेवारी 2026 रोजी किसनवीर महाविद्यालयाचे प्रा. विलास खंडाइत सर यांचे ‘श्री.स्वामी विवेकानंद आणि आजचा युवक’ या विषयावरती व्याख्यान संपन्न झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. विकास मांढरे उपस्थित होते. प्रा.विलास खंडाइत सर म्हणाले श्री.स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण भारताचा विचार केला त्यांना वाटत होते माझ्या देशातील प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घ्यावे शिक्षण घेतले तरच आपल्या देशातील दारिद्र्य,अंधश्रद्धा कमी होईल. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दुपारच्या सत्रात मुला- मुलींच्या क्रिकेटच्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.यामध्ये कार्यक्रमासाठी सहकार्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दत्तात्रय देसाई यांचे मिळाले तसेच श्री.कृष्णा कांबळे श्री.चंद्रकांत धोंगडे,श्री.वैभव देसाई श्री.अमर वसावे,कु.उमा येवले,सौ.संगीता देसाई,सौ.सायली भोसले,श्री.नाना चिंचकर, श्री.संदीप महाळुंकर या सर्वांच्या सहकार्यातून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें