घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वाशिममध्ये गारांसह मुसळधार पावसाचा तडाखा; जनजीवन काही काळ विस्कळीत

हवामान विभागाने मागील तीन दिवसांपासून ५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली होती. त्या अंदाजानुसार आज (दि. ३ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास वाशीम शहरात अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.या पावसासोबत किरकोळ गारपीटही झाली.

अचानक बदललेल्या हवामानामुळे काही मिनिटांतच पावसाची तीव्रता वाढली आणि शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले, तर बाजारपेठांमध्ये नागरिकांची धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत असून मोठ्या नुकसानीची भीती निर्माण झाली आहे.

हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें