घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सराईत गुंडाने बायकोच्या अंगावर थेट फॉर्च्युनर घातली अन्…; नाशिकमधील संतापजनक प्रकार

नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महापालिकेच्या राजीव गांधी भवन परिसरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून एका सराईत गुंडाने आपल्या 22 वर्षीय पत्नीला भररस्त्यात बेदम मारहाण करत, तिच्या अंगावर थेट ‘फॉर्च्यूनर’ कार घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या भयावह प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोजमीन मुस्तफा शेख (वय 22) ही गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पती समीर नासिर पठाण (रा. वडाळा गाव) याच्यासोबत आधार कार्डवरील नाव दुरुस्त करण्यासाठी महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथील कार्यालयात आली होती. काम सुरू असतानाच समीरने रोजमीनचा मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईलमधील ‘इंस्टाग्राम’वरील चॅट पाहिल्याने समीरचा रागाचा पारा चढला.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत समीरने तिला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यानंतर त्याने तिला बळजबरीने आपल्या फॉर्च्यूनर कारमध्ये (क्रमांक MH 16/7072) बसवले. चालत्या गाडीतही त्याने मारहाण सुरूच ठेवली. “तुला आज जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत समीर सीटच्या खालून काहीतरी हत्यार काढू लागला. यामुळे भयभीत झालेल्या रोजमीनने जीवाच्या आकांताने धावत्या गाडीतून उडी मारली आणि रस्त्यावरून पळू लागली.

सुदैवाने बचावलीपळून जाणाऱ्या पत्नीचा पाठलाग करत समीरने गर्दीची तमा न बाळगता “तुला आता गाडीखालीच मारतो,” असे ओरडत तिच्या अंगावर वेगाने कार घातली. सुदैवाने, गाडीचा जोरात धक्का लागून रोजमीन बाजूला फेकली गेल्याने तिचा जीव वाचला. मात्र, या धडकेत ती गंभीर जखमी झाली आहे. हा थरार पाहून आजूबाजूचे नागरिक धावून आल्याने संशयित समीर पठाण तिथून गाडीसह पसार झाला.

या घटनेनंतर जखमी पत्नीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित समीर पठाण विरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. समीर पठाण हा सराईत गुन्हेगार असून पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें