घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

3000 कोटींचा हिशोब संशयाच्या भोवऱ्यात

महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागामार्फत गेल्या चार वर्षांत करण्यात आलेल्या हजारो कोटी रुपयांच्या खर्चाची सखोल चौकशी करण्यासाठी तातडीने नैमित्तिक समिती स्थापन करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे केली आहे.

महापौरांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, प्रशासक काळात ड्रेनेज विभागाचे वार्षिक अंदाजपत्रक सुमारे साडेसातशे कोटी रुपये होते. त्यानुसार गेल्या चार वर्षांत जवळपास 3,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. याशिवाय ‌’जायका‌’ प्रकल्पासाठी चालू वर्षाअखेर सुमारे 900 कोटी रुपये खर्च झाले असून, सध्याच्या आर्थिक वर्षात इतर कामांमध्ये कपात करून 289 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राष्ट्रीय पूर नियंत्रण अभियानांतर्गत केंद्र सरकारकडून 280 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यातील 125 कोटी रुपये पूरप्रवण भागांसाठी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मात्र, या निधीचा नेमका वापर कसा झाला, याबाबत स्पष्टता नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. गेल्या चार वर्षांत ड्रेनेज विभागाने सुमारे 42 कोटी रुपयांचा खर्च केल्याची नोंदही त्यांनी केली आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमून त्यांना मोठ्या प्रमाणावर मानधन देण्यात आले, तसेच विविध कामांची बिले काढली असली, तरी प्रत्यक्ष कामांच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विशेषतः नव्याने समाविष्ट झालेल्या नऊ गावांमध्ये ड्रेनेज व्यवस्थेची अत्यंत वाईट स्थिती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें